You are currently viewing प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मांगवली :

कोकण विद्या प्रसारक मंडळ, मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय, मांगवली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. प्रमुख अतिथी मा. श्री. रविशंकर रासने यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी झेंडा गीत तसेच संगीत कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी नशामुक्ती, साक्षरता, SSC Boardच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियान, POSH Act व SHE Box, संविधान मूल्ये, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी याबाबत शपथ घेतली.
यावेळी मा. श्री. गणेशजी रासने व कुटुंबीय, पुणे यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मा. श्री. मंगेशजी शेलार यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
शाळेच्या शैक्षणिक उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांनीही अनमोल देणगी दिली. शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देणगीदार व माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक व देणगीदार मा. श्री. रविशंकर रासने व कुटुंबीय, पुणे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीशजी जागुष्टे, उपाध्यक्ष मा. श्री. महेशजी संसारे, संचालक मा. श्री. मंगेशजी शेलार, श्री. शरदजी कांबळे, श्री. राम पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. भोसले सर, मुख्याध्यापिका सौ. भोसले मॅडम, श्री. मोरे सर, श्री. कदम सर, सौ. मोरे मॅडम, माजी विद्यार्थी, पालक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक सहकार्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा