*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*
******
(इंग्रजी कवाफी)
सौदामिनी
लगागा/३ लगा
तसे काम सारेच मेजर सखे
कसे व्हायचे नीट प्रॅापर सखे
नको संशयाचा किडा या मनी
तुझ्याशीच माझे अफेअर सखे
सदा तूच माझी असे प्रेरणा
नव्या जीवनी तूच स्टार्टर सखे
तशा खूप माझ्या चुका नेहमी
अता तूच त्या कर रिपेअर सखे
मला भावते ना चमेली जुई
अबोली हवी तूच क्लोजर सखे
तुझे तूच समजून घे ना जरा
मनावर तुझा धुंद शॉवर सखे
अताशा नसे बॅास माझा कुणी
तुझी पाळतो फक्त ॲार्डर सखे
डॅा.शरयू शहा,मुंबई.
9619023330
