विटे / सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
विट्यातील साईझिंग ग्रुपच्या शरद नागरी पतसंस्था, अनिल यंत्रमाग कापड उत्पादक संघ, शारदा महिला नागरी पतसंस्था व शारदा यंत्रमाग संघ या चारही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली. “स्वर्गीय आत्माराम बापू यांनी सुरू केलेल्या चारही संस्था पारदर्शकतेने,अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू आहेत. बापूंचे विचार आणि संस्कार या संस्थांच्या जडणघडणीमध्ये उपयोगी पडले. बापूंच्या पश्चात श्री वैभवतात्या म्हेत्रे, धनंजय चोथे, शिवाजी तात्या कलढोणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संस्था चालवण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. ” असे गौरवोद्गार आमदार सुहासभैया बाबर यांनी काढले. स्वर्गीय आत्माराम बापू म्हेत्रे यांच्या ग्रुपच्या संस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
स्व.आमदार अनिलभाऊ बाबर स्व.आत्माराम बापू म्हेत्रे स्व.पोपटराव चोथे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सभेची सुरुवात झाली. अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरुवातीला सहाय्यक निबंधक कार्यालयाचे रफिक आतार यांनी सभासद प्रशिक्षण घेऊन सहकार कायद्यातील माहिती दिली.
नगराध्यक्ष सौ काजल म्हेत्रे म्हणाल्या,”म्हेत्रे परिवारातील सून नगराध्यक्ष होण्यासाठी आमदार सुहासभैया बाबर व अमोलदादा बाबर यांनी घेतलेली भूमिका आम्ही म्हेत्रे परिवार व समस्त सायझिंग ग्रुप कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी दिलेला विश्वास व जनतेने दिलेली साथ याचे चीज करण्याचा प्रयत्न करेन.
स्व.आत्माराम बापू व स्व.नामदेव दादा म्हेत्रे या माझ्या सासऱ्यांनी दिलेली शिकवण नगराध्यक्ष पदाचे काम चांगले करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”
उपनगराध्यक्ष अमोल बाबर म्हणाले,”विटा पालिकेचे राजकारण खऱ्या अर्थाने लोकशाहीकडे आले आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी व सर्वांगीण विकास करण्यासाठी थोडा वेळ जाईल.पण आम्ही भावा-भावांनी विटेकरांना दिलेले शब्द सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाही.”
नगरसेवक वैभवतात्या म्हेत्रे म्हणाले,”स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आत्मारामबापू म्हेत्रे व सायझिंग ग्रुप वर विश्वास दाखवला.तीच परंपरा आमदार सुहासभैया व अमोलदादा यांनीही राखली.बाबर परिवाराच्या मदतीमुळेच चार संस्था व सायझिंग ग्रुप उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत.
एकत्र असणाऱ्या आमच्या आदर्श म्हेत्रे कुटुंबीयांनी तसेच सर्व साईझिंग ग्रुप सदस्यांनी दिलेले योगदान,सभासदांनी, नागरिकांनी दाखवलेला विश्वास यामुळे नगरपालिकेतील अभूतपूर्व यश व संस्था चालवण्याची ताकद मिळवू शकलो.”
मान्यवरांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल दादा बाबर, नगरसेविका दिपाली अविनाश चोथे, शीला अशोक लिपारे, नगरसेवक वैभव म्हेत्रे,विशाल तारळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नुकताच महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा वस्त्रोद्योग भूषण हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैभवतात्या म्हेत्रे यांचा प्रमुख पाहुणे व यंत्रमाग धारकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना वैभव तात्यांनी हा पुरस्कार केवळ एकट्याचा नसून आम्हा सर्व म्हेत्रे परिवार तसेच संपूर्ण सायझिंग ग्रुपचा गौरव असल्याचे नमूद केले.
स्वागत,प्रास्ताविक विटा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तमराव चोथे यांनी केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, शिवाजीराव कलेढोणे, जगदीश म्हेत्रे. लक्ष्मण कोरे,विटा बॅंकेचे माजी संचालक संजयभाऊ म्हेत्रे, डिके चोथे दीपक चोथे,विनीत म्हेत्रे, रेवन शेंडे,प्रशांत म्हेत्रे, दत्ता कलढोणे यांच्यासह असंख्य सभासद उपस्थित होते.विशेषता महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच शरद पतसंस्थेचे चेअरमन धनंजय चोथे,व्हाईस चेअरमन सचिन म्हेत्रे ,शारदा महिला पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन शुभांगी कलढोणे, शारदा महिला कापड उत्पादक संघाच्या चेअरमन वैशाली चोथे, चार संस्थांचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी,सभासद यांची उपस्थिती होती. सर्वसाधारण सभेचे संयोजन सागर म्हेत्रे,राजधन चोथे,युवराज म्हेत्रे यांनी केले. सारंग म्हेत्रे यांनी आभार मानले.
