*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ. संध्या कुलकर्णी लिखित लज्जतदार पाककृती*
*टोमॅटो _बीट सुप*
*साहित्य*_१ बीट ४/५ टोमॅटो (आवडीनुसार) छोटा कांदा, लसूण पाकळ्या 2/3, आलं,मीठ, कॉर्नफ्लॉवर,मिरे पावडर
*कृती*_बीट साल काढून किसून घ्या. टोमॅटो ,कांदा चिरून घ्या. आलं लसूण ठेचून, कुकरमध्ये सर्व घालून पाणी घालून 2/3 शिट्ट्या करा. गार झाल्यावर ते मिक्सरमधून काढून पाणी हवे तेवढे घालून गाळून घ्या. गॅसवर उकळायला ठेवा.नंतर त्यात मीठ, मिरे पावडर घालून काॅर्नफ्लाॅवर थोडे पाण्यात कालवून त्याला लावा.(तुमच्या अंदाजानुसार) वरून कोथिंबीर, बटर/तूप घालून गरम गरम सुप प्यायला द्या.
एक सोपी आयडिया_ब्रेड आणून त्याचे तुकडे करून तळून मग ह्यात घालण्यापेक्षा.. मी टोस्ट घेऊन येते त्याचे तुकडे करते आणि यात घालते. पहा तुम्हाला पटत असेल तर..
आवडीनुसार प्रमाण जास्त कमी करू शकता
*सौ. संध्या कुलकर्णी..सातारा*
