विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार): नेहमीच नवोपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या अपेक्स अकॅडमी विटा येथे नुकताच फ्रेशर्स अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. इयत्ता 11वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री एडवोकेट वैभव (दादा) पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून श्री मुकेश यदुवंशी सर (IIT कानपूर) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते मा. हणमंतराव पाटील (साहेब) व विद्येची देवता, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस. एल पाटील यांनी केले. त्यांनी अल्पावधीतच अकॅडमीने कशी प्रगती केली आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तर कु. धनश्री जाधव कु. अवंतिका भंडारे कु.जानवी गारळे ,श्लोक सूर्यवंशी ,विराज होगले या विद्यार्थ्यांनी अपेक्स अकॅडमी बद्दल आपले विचार मांडले. या कार्यक्रमात प्रत्येक नवगतांना गिफ्ट देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात ऍड. वैभव पाटील म्हणाले की, ” मी अकॅडमी नफा मिळवण्यासाठी कधीच काढली नाही तर आपल्या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन दर्जेदार शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी अपेक्स अकॅडमीतच कोटा येथील शिक्षक आणून दर्जेदार शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व गव्हर्नमेंट कॉलेज मिळवून आपली व पालकांची स्वप्न पूर्ण करावीत. संस्थेच्या प्रत्येक शाखेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे नावाप्रमाणेच अपेक्स अकॅडमी सर्वोत्तम ॲकॅडमी म्हणून नावलौकिक मिळवत आहे. ”
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मुकेश यदुवंशी म्हणाले की ” विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या शिकवण्यावरती विश्वास ठेवावा. जे शिक्षक सांगतील तेवढेच करा. अभ्यासात सातत्य ठेवा. रोजचा अभ्यास रोजच करा. नियमित सराव करा. यश नक्की मिळेल. ”
संस्थेचे कार्यकारी संचालक श्री पी. टी पाटील म्हणाले की, ” आदरणीय दादांचे अपेक्स अकॅडमी पॅशन आहे. संस्थेने अकॅडमीस सुंदर इमारत, तज्ञ अनुभवी शिक्षक, होस्टेल व मेस ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. ”
अकॅडमीचे कॉर्डिनेटर श्री शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, ” अकॅडमीचे अध्ययन अध्यापनाचे काम अतिशय उत्तम चालू आहे. यावर्षी जेईई, नीट ,सीईटी चा निकाल नक्कीच चांगला लागेल.”
या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 12वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले. सूत्रसंचलन कु. वेदिका फडतरे, कु.श्रावणी जाधव कु. ईश्वरी तळेकर यांनी केले तर आभार कु. ईश्वरी तळेकर हिने मानले.
