You are currently viewing शितल एजन्सीत रिलायन्स गॅसची सेवा सुरू; पहिल्या पाच ग्राहकांना सिंगल शेगडी मोफत

शितल एजन्सीत रिलायन्स गॅसची सेवा सुरू; पहिल्या पाच ग्राहकांना सिंगल शेगडी मोफत

शितल एजन्सीत रिलायन्स गॅसची सेवा सुरू; पहिल्या पाच ग्राहकांना सिंगल शेगडी मोफत

कणकवली : प्रतिनिधी

एकादशीच्या शुभमुहूर्तावर शितल एजन्सीमध्ये रिलायन्स कंपनीच्या एलपीजी गॅस एजन्सीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एजन्सीचे संचालक अजित नाडकर्णी यांच्या हस्ते डॉ. शैलेंद्र आपटे यांना पहिले गॅस कनेक्शन व सिलिंडर वितरित करण्यात आला.
रिलायन्स गॅस एजन्सी खासगी स्वरूपाची असल्याने ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अट नसून, आवश्यकतेनुसार कितीही सिलिंडर उपलब्ध करून देण्याची सुविधा राहणार आहे. एजन्सीच्या सुरुवातीच्या निमित्ताने पहिल्या पाच कनेक्शनसोबत सिंगल शेगडी मोफत देण्यात येणार आहे.
या नव्या सुविधेला हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. लोकांची गरज लक्षात घेऊनच ही एजन्सी सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १५ ऑगस्टपासून रिलायन्स गॅसचे वितरण नवीन जागेतून सुरू करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष संदेशजी पारकर तसेच अॅड. उमेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा