*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त लेखक कवी अनिल भगवान चव्हाण लिखित अप्रतिम लेख*
*बदलत्या काळात लेखकांची भूमिका..*
“खर सांगायचं तर काही वर्षांपूर्वी मी एक सुंदर विचार लिहला होता की, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षक असतो पण रोज काहीतरी लिहणारा लेखक संपूर्ण समाजाचा शिक्षक, मार्गदर्शक असतो त्यामुळे शिक्षकांइतकीच जबाबदारी लेखकांवर सुद्धा असते.. त्यामुळे लेखक समाज मनाचा शिक्षक आहे आणि असा लेखक, समाजाचे प्रश्न, समाजाच्या व्यथा आपल्या लिखाणातून मांडताना दिसतो.. खरतर आजच्या काळात लेखकांची कमी नाही कॉपी, पेस्टचा जमाना आहे दुसऱ्याचा मजकूर स्वतः च्या नावावर खपवण्याच काम सतत होतांना दिसतय.. आपण दुसऱ्याचे विचार कॉपी करू शकतो,पण विचार मांडण्याची कला कॉपी करू शकतं नाही.. त्यामुळे अश्या डुप्लिकेट लेखकांच्या जमान्यात आजही खरे लेखक आपलं अस्तित्व टिकवून आहे.. काही दिवसापूर्वी एका जेष्ठ लेखकांसोबत माझी भेट झाली ते गृहस्थ जवळपास सत्तर वर्ष वयाचे असतील त्यांना मी माझं शोध सुखाचा हे पुस्तक भेट दिल..त्यावर ते लेखक म्हणाले की,“ तुम्ही सतत लिहत रहा आणि पुस्तकं प्रकाशित करत रहा.. इलेक्ट्रॉनिक मीडिया कितीही पुढे गेला तरी पुस्तकाला पर्याय नाही.. ”आजही एखाद पुस्तकं विकत घेवून ते वाचण्यात जो आनंद आहे तो आनंद त्या पुस्तकाचो PDF वाचण्यात नाही…त्यामुळे कुठेतरी आजही समाजाला लोकशिक्षण देण्यात लेखकांची भूमिका महत्वाची त्यामुळे लिहणाऱ्या लिहत जावं काळ कितीही बदलला तरी तुम्ही तुमच अस्तिव टिकवावं…”
✍️ *अनिल भगवान चव्हाण (ABC )*
*(डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त लेखक, कवी, शिक्षक )*
✍️संपर्क -8806379959
