You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात वाणिज्य विभागातील करिअर संधींवर मार्गदर्शन

वैभववाडी महाविद्यालयात वाणिज्य विभागातील करिअर संधींवर मार्गदर्शन

वैभववाडी महाविद्यालयात वाणिज्य विभागातील करिअर संधींवर मार्गदर्शन

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशनच्या वतीने “वाणिज्य विभागातील करिअरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. माणिक चौगुले, इतिहास विभाग प्रमुख प्रा.सुरेश पाटील,
कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.रणजीत पाटील उपस्थित होते.

प्रमुख वक्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय बोडस यांनी “वाणिज्य विभागातील करिअरच्या संधी”
या विषयावर सविस्तर माहिती दिली. चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी (CMA), कंपनी सेक्रेटरी (CS), बँकिंग, विमा, कर सल्लागार, शेअर बाजार, एमबीए, डिजिटल फायनान्स, ई-कॉमर्स, उद्योजकता तसेच विविध सरकारी व खासगी क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्यविकास, संवादकौशल्य, संगणकीय ज्ञान, इंग्रजीवरील प्रभुत्व आणि सातत्याने नवीन ज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून योग्य करिअरची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची दिशा मिळते व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रणजीत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन डॉ.राहूल भोसले यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा