You are currently viewing गिधाडे

गिधाडे

*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*” गिधाडे “*

 

वेशीवरती “संकट रुपी ”

झडप घालण्या सज्ज “गिधाडे”

माता – भगिनी बिथरुन गेल्या

भविष्याला ही प्रश्न पडे. / १/

 

सात्त्विक, सनातनी या भूमीवर

अंधारुन आले काळे मेघ

सैतान उभा हा, पसरुन बाहू

परिस्थिती चा घेण्या “वेध” /२/

 

परसत्तेची, परतंत्राची

होऊ घातली “नांदी ”

धूर्त,धोरणी,राजकारणी

करुनी घेती “चांदी”. /३/

 

कुठे जात,तर !कुठे धर्म तर,

देवादिकांची खिल्ली

यश -अपयशाची यांच्या आहे

जनते हाती “किल्ली “. /४/

 

“धर्मयुद्ध” अन् “प्रेमयुद्धाचे”

” अनर्थ युद्ध” हे परिणाम

नाजुक”कळ्या “फुलण्याआधी

कुस्करण्या येती”अधम” /५/

 

असंख्य “सवाल”मातृभूमी चे

उभे आज ठाकले

जुन्या जाणत्या “सम्राटांनी”

गड पाहिजेत राखले. /६/

 

रचना:— मोहन मराठे…..

प्रतिक्रिया व्यक्त करा