You are currently viewing सावंतवाडी पंचायत समितीची ६ ऑगस्टची आमसभा पुढे ढकलली; आता १४ ऑगस्टला होणार

सावंतवाडी पंचायत समितीची ६ ऑगस्टची आमसभा पुढे ढकलली; आता १४ ऑगस्टला होणार

सावंतवाडी पंचायत समितीची ६ ऑगस्टची आमसभा पुढे ढकलली; आता १४ ऑगस्टला होणार

बैठकीची वेळही बदलली; सकाळी १०.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी पंचायत समितीची गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली आमसभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून, आता ही सभा शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात होणार आहे.
यापूर्वी ही आमसभा ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणांमुळे सभेच्या तारखेसह वेळेतही बदल करण्यात आला आहे.
या बदलाची सर्व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा