You are currently viewing गेलेली माणसं जर परत आली तर
Oplus_16908288

गेलेली माणसं जर परत आली तर

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लघुलेख*

 

*गेलेली माणसं जर परत आली तर—*

 

हा भावनिक विचार मनाला आनंद देणारा.

माणूस जातो, त्याच्या आठवणी मात्र कितीही ठरविले तरी मनातून जाता जात नाहीत, त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली,त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती विचार करू लागते कीआपल्याला प्रिय असलेली व्यक्ती पुन्हा आली तर– परंतु हे त्रिकालाबाधित सत्य आहे की गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच येत नसते.

खरच जर अस प्रत्यक्षात घडलं तर त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या व्यक्तीला होणारा आनंद शब्दातीत असेल. !काय करू अन काय नाही अशी मनाची स्थिती होईल. आई वडिलांचे प्रेम, आजी आजोबा व मित्र, लाडकी बहीण, भाऊ, किती नाती आनंदी होतील राहून गेलेल्या गप्पा बोलणं होईल. कुणाची माफी मागायची राहिली असेल लाड करायचे किंवा करवून घ्यायचे असतील तर, मिठी मारायची असेल तर– सगळ सगळं करता येईल पण हेही तितकंच खरं , अति परिचयात अवज्ञा या उक्तीप्रमाणे समोरच्या व्यक्तीशी कसेही वागले तरी हरकत नाही असं ही वाटू लागेल. आणि हो, हसू नका, विचार करा, सासू सुनेच्या किंवा नको असलेल्या न आवडणाऱ्या नात्याचे काय? कंटाळतील न ते? आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे निसर्गाचा समतोल नाही का बिघडणार? वाढत्या लोकसंख्येत अधिक भर पडेल , त्यामुळे अन्न वस्त्र निवारा शुद्ध हवा व पाणी ह्या मुलभुत गरजा पुरविणाऱ्या साधनांवर किती भार पडेल? गोंधळ अराजकता निर्माण होईल मूलभूत गरजा भागविण्यासाठी पुरेसा पैसाही सगळ्यापाशी नसेल. समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात , वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे समाजात असुरक्षितता वाढते तसेच एकमेकांबद्दलची आत्मीयता कमी होईल जीवनात एखाद्या वस्तूची कमी असल्यावर ती कशी मिळेल असा वाटत आणि सहज उपलब्ध असणाऱ्या सुख सुविधे चे महत्व राहत नाही हा तर साधा सरळ नियम आहे

 

गेलेली माणसे परत आली तर होणार आनंद क्षणिकच असेल त्याचे परिणाम मात्र दूरगामी असतील

निसर्गाने जीवन मृत्यूचे जे चक्र निर्माण केले आहे तेच योग्य आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.

आणि गेलेली माणसे शरीराने गेलेली असली, तरी मनाने संस्काराने आठवणीने आपल्या जवळच असतातच त्याचा आपण अनुभव घेतच असतो ना?. उलट ते असताना जेव्हडे त्यांचे विचार, बोलणे आपल्याला पटलेले नसते त्याची सत्यता पटू लागते हे निर्विवाद सत्य आहे हो ना?

म्हणूनच गेलेली माणसे परत आली तर? असा विचार न करता त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपण काय शिकू शकतो ह्याचा विचार करा आनंदाने जगा आणि इतरांनाही जगू द्या शेवटी काय? दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद

 

 

प्रतिभा पिटके, अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा