You are currently viewing मैत्री

मैत्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रणिता खंडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मैत्री*

 

जागेपणी जगाचं भान विसरायला लावण्याची

ताकद असते मैत्री,

बेभान मनाला ताळ्यावर आणणारी हिंमतही असते मैत्री.

अशाश्वत जगातलं, डोळे झाकून विश्वास ठेवण्याचं स्थान असते मैत्री.

स्थल-काल-वेळाच्या सीमा झुगारूनही शाश्वत

उरते, मैत्री.

मनातलं सारंच बोलून टाकण्यासाठी हक्काची

जागा असते मैत्री,

न बोलताही मनातलं समजून घेणारी जादुई असते मैत्री.

पोळलेल्या मनावरती फुंकर घालणारी असते मैत्री,

आनंदाने डोळे भरून वाहणारीही असते मैत्री.

विसाव्याचं, जिव्हाळ्याचं बेट भक्कम, असते मैत्री,

आयुष्याच्या आभाळातलं इंद्रधनुष्यच असते मैत्री.

साद घालण्याआधी प्रतिसादाची खात्री म्हणजे, असते मैत्री आणि

साद न घालताही सावरण्यासाठी सरसावते ती असते मैत्री.

 

*©प्रणिता खंडकर.*

प्रतिक्रिया व्यक्त करा