You are currently viewing सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; सरकारी रुग्णालयांची दयनीय अवस्था – मनसेचा घणाघात

सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; सरकारी रुग्णालयांची दयनीय अवस्था – मनसेचा घणाघात

सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; सरकारी रुग्णालयांची दयनीय अवस्था – मनसेचा घणाघात

आरोग्य उपकेंद्रांच्या उद्घाटनांपेक्षा नियमित सेवा द्या; जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि महिला-बाल रुग्णालयातील सुविधांबाबत कुणाल किनळेकर यांचे गंभीर प्रश्न

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य व्यवस्था कोलमडली असून सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाची अवस्था “व्हेंटिलेटरवर” असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. “आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” अशी परिस्थिती जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व नवीन उपकेंद्रांच्या घोषणा करून जनतेला केवळ “रिकामी खोकी” देत असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला. अमावस्या व पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे घेऊन प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा नागरिकांना नियमित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे त्यांनी म्हटले.
खाजगी रुग्णालये आणि डॉक्टरांच्या लॉबीमुळे सरकारी आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली असल्याचा आरोप करत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सावंतवाडी आणि ओरोस येथील सरकारी रुग्णालयांतून दरमहा किती रुग्णांना बांबोळी (गोवा) येथे पाठवले जाते? सर्वच रुग्णांना बाहेर पाठविण्याची गरज असते का? याची माहिती लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणे, सोनोग्राफी मशीन बंद असणे, काही ठिकाणी यंत्रसामग्री असूनही तंत्रज्ञांची कमतरता, तज्ज्ञ डॉक्टर ओपीडीमध्ये अनुपस्थित राहून खासगी रुग्णालयात सेवा देत असल्याचा आरोप, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील काही वॉर्ड डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे बंद ठेवण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला.
या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना उपचारांसाठी गोवा, कोल्हापूर किंवा मुंबई गाठावी लागत असून ही सिंधुदुर्गसाठी शोकांतिका असल्याचे किनळेकर यांनी म्हटले. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बिकट परिस्थितीसाठी आमदार, खासदार आणि पालकमंत्री जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी पत्रकाद्वारे केली.

_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त महाविद्यालये

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
संपर्क : 9421154594 9421230915 9405071319
www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*. *देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
संपर्क : 8600879426 7588868705
www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
अभ्यासक्रम.
कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
संपर्क: 9421154594 7588868705
www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

कॉलेज व्हिडिओ
https://youtu.be/STjqIuIBdmU?feature=shared
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा* https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*खालील संकेतस्थळावरती जाऊन आपण फॉर्म दिनांक 02 ऑगस्ट 2026 पर्यंत भरू शकता.*

https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=4e898dd9-f749-436d-b3e1-3417f5632f77&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=9a40d12f-fa5a-4b43-b7f0-762fb2b9ded5

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209787/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा