You are currently viewing आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची 2 ऑगस्ट ला सावंतवाडी येथे बैठक

आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची 2 ऑगस्ट ला सावंतवाडी येथे बैठक

आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची 2 ऑगस्ट ला सावंतवाडी येथे बैठक

सावंतवाडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी,महिला व युवक कार्यकारिणी तसेच सर्व तालूका अध्यक्ष यांची महत्वपूर्ण बैठक येत्या रविवार दि.2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 02.00 वाजता सावंतवाडी येथील मॅंगो हॉटेल मध्ये आयोजित करण्यात येत आहे.
सदर बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव- रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष- अजितकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर बैठकीत पक्ष संघटनात्मक बांधणी तसेच जनतेच्या विविध विकासात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याने सर्वानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस – प्रकाश कांबळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा