You are currently viewing गुरुवंदना
Oplus_16908288

गुरुवंदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरुवंदना…*

 

प्रथम गुरू असते आई दुजा असतो गुरू

शाळेमध्ये पाऊल टाकता शिक्षण होते सुरू..

 

कच्चे मडके थोपटून ते देती त्या आकार

किती प्रकारे घडवती करती ते साकार..

 

सामदाम दंडभेद वापरून प्रसंगात

नानाकला नाना विद्या भिनवती अंगात..

 

कर्तव्यकठोर असती गुरू समयोचित असती

अशा गुरूंवर अनन्यभावे फक्त करावी प्रीति..

 

मनात शिरती गुरू आपल्या मनकवडे जणू

सोनारासम छात्र घडवती पकडून अणुरेणू..

 

शिस्त न्याय कर्तव्य आणखी नानाविध प्रकार

जीवन आपले अर्पून देती शिष्यांना आकार..

 

गुरूचरणी नतमस्तक विनम्रभावे सेवा

ज्ञानाचा ते अर्पितात अनमोल असा ठेवा..

 

विस्मृतीत ना जाती गुरू आमरण स्मरती

अनंत उपकारांचे ओझे ठेवून जाती वरती..

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा