वाकड, चिंचवड –
दिनांक 25 जुलै 2026 रोजी देवशयनी आषाढी एकादशी निमित्य आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची (वाकड ) सकाळी नऊ वाजता राम मंदिरापासून दिंडी काढण्यात आली ,यामध्ये महिला आणि पुरुष सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
पुरुष सभासदांच्या हातात पताका महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन माऊलीची मूर्ती, संत तुकाराम महाराज ची मूर्ती ,हातात टाळ मुखात विठ्ठलाचे नाम घेत फेरी काढण्यात आली .यामध्ये महिलांनी अभंग ,भजन, गवळणी, भारुड तसेच फुगड्या व फेर धरून टाळांच्या गजरात विठ्ठल नामाचे जय घोष करण्यात आले.
राम मंदिरामध्ये आरती व मंत्रोपचार झाल्यानंतर प्रसाद सर्व सभासदांना वाटण्यात आला. अशा रितीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमांमध्ये आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, महिला सभासद ,पुरुष सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
