वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ मठात २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव
दुग्धाभिषेक, आरती, दिवसभर भजनांचा कार्यक्रम; महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन
वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार, दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुकांवर दुग्धाभिषेक होणार असून, सकाळी ७.३० वाजता नित्य आरती व अभिषेक करण्यात येईल. सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
या गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून दर्शन, पूजन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
