You are currently viewing विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी

मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि ज्ञानपरंपरेची वाहक आहे. जागतिकीकरण आणि डिजिटल युगाच्या पार्श्वभूमीवर नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात, वाचन-लेखनात तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक वापर करावा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा 2025-26 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथील मायनाक भंडारी सभागृहात संपन्न झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रतिभा वरळे, शिक्षणतज्ज्ञ प्रविण शेवडे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य वामन पंडित, म. ल. देसाई, डॉ. शरयू आसोलकर, वृंदा कांबळी तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्रीम. तांबे हे उपस्थित होते.

            अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य, विश्वकोश, चरित्रग्रंथ आणि संदर्भग्रंथांचे नियमित वाचन करून ज्ञानसमृद्ध होण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषेचे संवर्धन व जतन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून नव्या पिढीने त्यासाठी पुढाकार घ्यावा. यापुढे होणाऱ्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ज्ञावर्धन स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग करावा.

            प्रथमच राज्यभर ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची परीक्षा दि. 29 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 93 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तर व तालुकास्तरावरील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. जिल्हास्तरावर 3 हजार रुपये, 2 हजार रुपये व 1 हजार रुपये तसेच तालुकास्तरावर अनुक्रमे 1 हजार रुपये, 750 रुपये व 500 रुपये  इतकी रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात आली.

            विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरावर शहरी व ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 10 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला घेतला होता. जिल्हास्तरावरील स्पर्धेत एकूण 10 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले असून त्यामध्ये शहरी विभागातील 4 व ग्रामीण विभागातील 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच तालुकास्तरावर 39 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले आहे.

            जिल्हास्तरीय शहरी विभागातून कुमारी संगम तेजस्वी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) यांनी प्रथम, कुमारी एकता तांडेल (भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मालवण) यांनी द्वितीय, कुमार अमेय आपटे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) यांनी द्वितीय, तर कुमारी साक्षी गुरव (राणी पार्वतीवी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

            जिल्हारीय ग्रामीण विभागातून कुमार सोहम टेंबुळकर (शंकर एम. विद्यालय, कुंभवडे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कुमारी अक्षया गोवेकर ने द्वितीय, कुमार नकील गुरुप्रसाद ने द्वितीय, सावंत रत्नदीप ने द्वितीय, (शंकर एम. विद्यालय, कुंभवडे) मिळवला. तसेच कुमारी सिया (श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वाडाचापाट, मालवण) आणि कुमारी अश्वमी देसाई (कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा