You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा दोन दिवसांत पूर्ववत; नादुरुस्त पंपाची तातडीने दुरुस्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा दोन दिवसांत पूर्ववत; नादुरुस्त पंपाची तातडीने दुरुस्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा दोन दिवसांत पूर्ववत; नादुरुस्त पंपाची तातडीने दुरुस्ती

रुग्णालय प्रशासन, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेबद्दल जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी मानले आभार

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागातील एअर प्रेशर (एअर पंप) यंत्रणा नादुरुस्त झाल्याने काही काळ सेवा विस्कळीत झाली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या तत्पर प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत पंपाची दुरुस्ती करून डायलिसिस सेवा पूर्ववत करण्यात आली. याबद्दल जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी समाधान व्यक्त करत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
रुग्णालयात दररोज सुमारे १५ रुग्ण मोफत डायलिसिस सेवेचा लाभ घेतात. ही सेवा बंद पडल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्णांची गैरसोय झाली होती. खासगी रुग्णालयात डायलिसिससाठी सुमारे दीड हजार रुपये खर्च येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर रुग्णांनी राजू मसूरकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर नादुरुस्त पंप तातडीने काढून कुडाळ येथील कंपनीकडून दुरुस्त करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी आनंदराव गायकवाड यांनी स्वतः कुडाळ येथे जाऊन दुरुस्त केलेला पंप आणला. त्यानंतर डायलिसिस विभागाचे तंत्रज्ञ किरण पारसेकर, नितीन पांढरे, परिचारिका शिल्पा झोरे, हेड सिस्टर सुप्रिया नाईक तसेच प्लंबर कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून पंप बसविला आणि सेवा पुन्हा सुरू केली.
डायलिसिस सेवा तातडीने पूर्ववत करून गोरगरीब रुग्णांना दिलासा दिल्याबद्दल रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राजू मसूरकर यांनी रुग्णांच्या वतीने आभार मानले. गोरगरीब रुग्णांसाठी अशीच निस्वार्थ सेवा कायम राहो, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा