You are currently viewing कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित केल्यास आंदोलन छेडणार – वैभव नाईक

कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित केल्यास आंदोलन छेडणार – वैभव नाईक

कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित केल्यास आंदोलन छेडणार – वैभव नाईक

शल्य चिकित्सक, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत केली चर्चा…

कणकवली

कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित केल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली.
श्री. नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेली कार्डीयाक कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करता राज्य शासनाचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कार्डीयाक कॅथलॅब युनिट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर व्हावे याकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी व खासदार विनायक राउत यांनी पाठपुरावा केलेला होता. त्यानंतर ते सुरु करण्यास मंजुरी देखील देण्यात आलेली होती. परंतु केवळ एका खासगी रुग्णालयांच्या फायद्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दबावामुळे जागेचे कारण दाखवत हि लॅब सोलापूर जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचा विचार करता हि लॅब अत्यंत महत्वाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना या लॅब च्या माध्यमातून अँजिओग्राफी, फ्लास्टिक सर्जरी, बायपास सर्जरी यांचे मोफत उपचार घेता आले असते. केवळ जागे अभावी हि कार्डीयाक कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित असल्याचे कारण निव्वळ सिंधुदुर्ग जनतेच्या डोळयात धूळ मारण्यासारखे आहे. कारण जिल्हा रुग्णालयाने यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जागा हस्तांतरित केलेल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये याकरिता जागा उपलब्ध आहे. तसेच कुडाळ येथील महिला बाल जिल्हा रुग्णालयामध्ये पण यासाठी विस्तृत जागा उपलब्ध आहे. परंतु सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मोठे खाजगी रुग्णालय कार्यरत आहे कि ज्यामध्ये हि कार्डीयाक कॅथलॅब युनिट सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ या खाजगी रुग्णालयावर व्यावसाईक परिणाम होऊ नये याकरिता वैयक्तिक फायद्यासाठी दबाव निर्माण करून हि कार्डीयाक कॅथलॅब
युनिट सोलापूर जिल्ह्यात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यशासनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करतो. तसेच सदरची सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली कॅथलॅब युनिट हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सुरु न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील श्री नाईक यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा