You are currently viewing वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा

वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा

वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा

१४ जुलै रोजी स्वामिनी मंगल कार्यालयात दुपारी २.३० वाजता आयोजन; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

वेंगुर्ले :

“विद्या विनयेन शोभते, गुरुजनांच्या प्रेरणेने यश फुलते…” या प्रेरणादायी भावनेतून मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दुपारी २.३० वाजता वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालय येथे होणार असून, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाज घडविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रेरणादायी सोहळ्यास नागरिकांनी सपरिवार उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यासाठी सहभाग नोंदवावा, तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा