जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त कणकवली व कुडाळ येथे विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धा
19 जुलै रोजी दोन केंद्रांवर होणार स्पर्धा; 17 जुलैपर्यंत नोंदणी, मर्यादित 50 खेळाडूंनाच प्रवेश
कणकवली :
जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त श्री चेस अकॅडमी, कणकवली आणि नवजीवन चेस अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 19 जुलै 2026 रोजी अकॅडमिक अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा दोन केंद्रांवर पार पडणार असून, श्री चेस अकॅडमी, शिवाजीनगर, कणकवली येथे सकाळी 9 ते 12.30 या वेळेत, तर प्राथमिक शाळा, एमआयडीसी, रेस्ट हाऊसजवळ, कुडाळ येथे दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत सामने खेळविण्यात येणार आहेत. सहभागी खेळाडूंना या दोन्ही केंद्रांपैकी कोणत्याही एका केंद्रावर खेळण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.
स्पर्धा इयत्ता 1 ली ते 5 वी आणि इयत्ता 6 वी ते 12 वी अशा दोन गटांत होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार असून सर्व सामने फिडे (FIDE) च्या नियमांनुसार होतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. नोंदणीसाठी खेळाडूचे नाव, इयत्ता आणि GPay पेमेंटचा स्क्रीनशॉट 9422381949 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. नोंदणीची अंतिम मुदत 17 जुलै 2026 असून, दोन्ही केंद्रांवर मिळून केवळ 50 खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार आहे.
स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना सुवर्णपदक, पुढील पाच विजेत्यांना रौप्यपदक, तर उर्वरित सर्व सहभागी खेळाडूंना कांस्यपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आडेलकर (मो. 9422381949) किंवा म्हापसेकर सर (मो. 9975482903) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
