You are currently viewing जुलकाफिया

जुलकाफिया

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

 

जलौघवेगा+नृपात्मजा

लगालगागा/३ लगालगा

जुलकाफिया

 

भरून आले मळभ मनावर, हटेल सत्वर तुझ्यामुळे

गझल मनाचा झरा सुखाचा, सजेल झालर तुझ्यामुळे

 

पराभवाने हरू कशाला, करेन त्याचीच पायरी

दिवसभराच्या समर्पणाने, फुलेल अंबर तुझ्यामुळे

 

कसेबसे हे नकोच जगणे, कलात्मतेने जगायचे

श्रमास उत्तर दुधामधे या, पडेल केशर तुझ्यामुळे

 

कितीक झाल्या जिवास जखमा, हृदय निरंतर दुखावले

अतीव प्रेमळ सुखावणारी, मिळेल फुंकर तुझ्यामुळे

 

वडीलधाऱ्यांसवे रमू या, करून सेवा घडोघडी

मनाप्रमाणे कृतार्थ जगणे, घडेल सुंदर तुझ्यामुळे

 

डॅा.शरयू शहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा