*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम कविता*
*श्री स्वामी समर्था*
————————————-
उपदेशाचे बोल तुमचे
शिदोरी आमची समर्था
ज्ञानामृत असे सारे हे
जाणुनी घेण्यासी या अर्था
गहन जीवन असे सारे
सुलभ तेही तुम्ही केले
उलगडून दाखवले आम्हा
सुसह्य जीवन सारे केले
आतुर असते मन सदा
दर्शना तुमच्या हो समर्था
ताप-व्यापातून दूर ठेवा
तुमच्या भक्तासी समर्था ।।
विनवणी करी अरुणदास
चरणी तुमच्या हो समर्था ।।
———————————–
कविता – श्री स्वामी समर्था
कवी अरुणदास “अरुण वि. देशपांडे-पुणे
————————————————-
