You are currently viewing काळजातला मोर
Oplus_16908288

काळजातला मोर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काळजातला मोर* 

 

वाट चंद्राची चकोर पाहतोय चांदण्या रात्रीला

काळजातला मोर नाचतोय साजनाच्या भेटीला ||धृ||

 

या हो साजना रात बहरली टिपूर चांदण्यात

प्रीतीच्या फुलाचा आलाय बहर ऐन यौवनात

रातराणीचा गंध दरवळला इश्काच्या रातीला

काळजातला मोर नाचतोय साजनाच्या भेटीला ||१||

 

रोमारोमात नशा सळसळते तुमच्या प्रेमाची

मिठीत यावं सजना ओढ लागली मिलनाची

कबुतराची गुटरं गूं वेड लावी खुळ्या मनाला

काळजातला मोर नाचतोय साजनाच्या भेटीला ||२||

 

रातकिड्यांची किरकिर करी शांतता भंग

मकरंद चाखायच्या नादात भवरा झाला दंग

अंगा अंगाची लाही संग आस मदनाची रतीला

काळजातला मोर नाचतोय साजनाच्या भेटीला ||३||

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा