You are currently viewing लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलनात लेकीच्या कर्तृत्वाचा काव्यमय जागर

लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलनात लेकीच्या कर्तृत्वाचा काव्यमय जागर

‘लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलनात लेकीच्या कर्तृत्वाचा काव्यमय जागर

चिंचवड

कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहपूर्ण आणि भावनाप्रधान वातावरणात संपन्न झाले. चिंचवड येथील सुखी भवन सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लेकीचे अस्तित्व, तिचे कर्तृत्व, संघर्ष, माया आणि यश यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या कवितांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. तुकाराम पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र घावटे, सौ. सविता इंगळे आणि सुरेश कंक उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. रोहिता गांधी यांनी ‘आहार व आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करत संतुलित जीवनशैलीचे महत्त्व विशद केले.
उद्घाटक प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे यांनी आपल्या पहाडी आवाजात आणि प्रभावी शैलीत,”लेक माऊली बापाची, लेक साऊली बापाची, लेक माहेराचा थाट, लेक संसाराचा पाट…”या ओळी सादर करत आई- वडील आणि लेकीतील अतूट नात्याचे हृदयस्पर्शी वर्णन केले. अध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लेकीच्या कर्तृत्वाचा गौरव करत तिच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे राजेंद्र घावटे, सविता इंगळे आणि सुरेश कंक यांनीही लेकीचे गुणगान करणाऱ्या आपल्या रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेला राज्यभरातील तब्बल १०८ कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतील कवितांचे परीक्षण ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा फाटक यांनी केले.
स्पर्धेत सरिता कलढोणे आणि प्रदीप बडदे यांना संयुक्त प्रथम क्रमांक, आर. पी. शिखरे आणि रजनी अहेरराव यांना संयुक्त द्वितीय क्रमांक, तर सुवर्णा बच्छाव आणि प्रतीक्षा ढोकळे यांना संयुक्त तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला. तसेच सुजाता भडभडे, सरोज गाजरे, सानिका पाटील, रसिका शाळिग्राम, योगिता कोठेकर आणि मंजुषा थावरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर झालेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात सुमारे २५ कवींनी ‘लेक लाडकी’ या विषयावर आपल्या भावस्पर्शी कविता सादर केल्या. दिनेश भोसले, हेमंत जोशी, शामराव सरकाळे, सुहास घुमरे, शोभा जोशी, वंदना इन्नानी, पितांबर लोहार, प्रदीप गांधलीकर, संतोष गाढवे, सुप्रिया लिमये, माधुरी डिसूजा,मीरा भागवत, कमल सोनजे,अरुण कांबळे, राधाबाई वाघमारे, जयश्री श्रीखंडे,नयन गोवंडे, संध्या शिंदे, नीलिमा फाटक यांच्या काव्य सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. लेकीच्या मायेचा, संघर्षाचा, कर्तृत्वाचा आणि कुटुंबातील तिच्या स्थानाचा विविध पैलूंनी वेध घेणाऱ्या कवितांनी उपस्थितांना भावूक केले.
या प्रसंगी मा. अभय पोखरणा, मीना पोखरणा, इंदोर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक संदीप राशिनकर व श्रिती राशिनकर,
प्रा. पांडुरंग भोसले तसेच महेंद्र भारती यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सीमा शिरीष गांधी यांनी केले. त्यांनी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले, तर संध्या शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण शिंदे, सिद्धार्थ गांधी, छाया शीलवंत आणि शांतीलाल गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. या साहित्यिक सोहळ्यास राज्यभरातील कवी, साहित्यिक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

——————————-
👉🏼*गाडी घ्यायची आहे पण कर्ज करिता इनकम प्रूफ नाही*
मग विचार कसला करताय
खास आपल्या करिता आम्ही घेऊन आलो
🌈*नो इनकम प्रूफ लोन स्कीम*

देशाची सर्वात जास्त विकली जाणारी कार टाटा पंच आणि सेफस्ट स्मॉल कार टाटा टियागो करिता
✅*डाउन पेमेंट केवळ ₹.९४,९९९/-*

आजच आपल्या जवळ चे आमचे शोरूम ला भेट द्या अथवा आम्हाला कॉल करा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपूर्ण स्वदेशी अभियान*
*भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
https://t.ly/pdI_1
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
_Credit approval at the sole discretion of bank_
नवनवीन अपडेट्स करीता फॉलो करा
*https://www.instagram.com/tata_motors_spautohub_rtn?igsh=YmRyMW12amRlaGpw*

प्रतिक्रिया व्यक्त करा