संदिप गावडे व गौरव मुळीक यांनी घेतली आपत्तीग्रस्तांची भेट; तात्काळ मदतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा
सावंतवाडी :
चौकुळ-बेरडकी परिसरात झालेल्या चक्रीवादळामध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन छप्परे व पत्रे उडाल्याने कुटुंबांवर संकट ओढवले. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या नुकसानग्रस्थ नागरिकांना पत्रे तसेच कौलांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे व सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपत्तीग्रस्तांची भेट घेतली.
नुकसानग्रस्त कुटुंबांना घरे पुन्हा उभी करण्यासाठी पत्रे व छपरासाठी कौलांची मदत केली. भारतीय जनता पक्षाच्या या तत्पर मदतीमुळे संकटग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, गावकऱ्यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. यावेळी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बुथ अध्यक्ष संतोष गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, अच्युत गावडे, दयानंद गावडे तसेच चौकुळ गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
