You are currently viewing ८७ वर्षीय शिक्षिका नाईक बाईंना माजी विद्यार्थ्याची भावनिक भेट; बालपणीच्या आठवणींना उजाळा

८७ वर्षीय शिक्षिका नाईक बाईंना माजी विद्यार्थ्याची भावनिक भेट; बालपणीच्या आठवणींना उजाळा

८७ वर्षीय शिक्षिका नाईक बाईंना माजी विद्यार्थ्याची भावनिक भेट; बालपणीच्या आठवणींना उजाळा

मालवण येथे राजू मसूरकर यांनी घेतली सदिच्छा भेट; गुरूंच्या संस्कारांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

मालवण :

सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती नाईक (वय ८७) यांची त्यांचे माजी विद्यार्थी राजू मसूरकर यांनी मालवण येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान बालपणीच्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला असून गुरू-शिष्य नात्यातील जिव्हाळ्याचे दर्शन घडले.
राजू मसूरकर हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मालवण येथे आले असता त्यांनी मालवण बाजारपेठ परिसरातील निवासस्थानी जाऊन नाईक बाईंची भेट घेतली. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांची प्रकृती आणि स्मरणशक्ती उत्तम असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. नाईक बाईंना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
भेटीदरम्यान मसूरकर यांनी शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत लहानपणी शिकलेल्या कविता म्हणून दाखवल्या. त्या ऐकून नाईक बाई भावूक झाल्या. कळसुलकर इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि प्रेम यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
कै. शिवाजी भिसे सर, साळकर सर, सापळे सर, कोंडवेकर सर, कळसुलकर सर, सानगावकर सर, जांभोडकर बाई, जीवाण बाई, कस्तुरबा बाई, पंडित बाई, माणगावकर बाई तसेच कामत बाई, बुवा बाई, परुळेकर बाई, देवधर बाई, परांजपे सर आदी शिक्षकांचे योगदान त्यांनी यावेळी कृतज्ञतेने स्मरले.
यावेळी नाईक बाईंची काळजी घेण्याची विनंती त्यांच्या भाचे अमित नाईक यांच्याकडे करण्यात आली. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या गुरूंशी संपर्क ठेवून त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन राजू मसूरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा