You are currently viewing जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश:

*सावंतवाडी*

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल विद्यार्थ्यांनी CBSE इंग्रजी माध्यमातूम पूर्व उच्च प्राथमिक (Pre Upper Primary) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या विशेष प्रविण्य गुणवत्ता यादीत (District Merit List) मानाचे स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत प्रशालेच्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली. त्यामध्ये इयत्ता ६ वी च्या कु. कुशल तांडेल याने जिल्ह्यात तिसरा क्रमांक, कु. जान्हवी सावंत हिने दहावा क्रमांक, कु. सई नाईक हिने तेरावा क्रमांक, तर कु. वरद सावंत याने तेविसावा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याचे शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवत इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. भविष्यातही शाळेचे विद्यार्थी विविध शैक्षणिक क्षेत्रांत अशीच उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास शाळेच्या संचालकांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा