You are currently viewing धावत्या डंपरवर झाड कोसळले; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

धावत्या डंपरवर झाड कोसळले; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

धावत्या डंपरवर झाड कोसळले; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

सावंतवाडीच्या कोलगाव येथील यामाहा शोरूमजवळील घटना; चालक सुखरूप, काही काळ वाहतूक ठप्प

सावंतवाडी 

सावंतवाडीतील कोलगाव परिसरात शनिवारी दुपारी धावत्या डंपरवर अचानक मोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दुपारी सुमारे ३.१० वाजण्याच्या सुमारास कोलगाव येथील यामाहा शोरूमजवळ ही घटना घडली. या अपघातात डंपरचे नुकसान झाले असले, तरी चालकासह कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर आपल्या मार्गाने जात असताना रस्त्याकडील मोठे झाड अचानक थेट वाहनावर कोसळले. झाड कोसळल्याच्या मोठ्या आवाजाने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि नशिबाच्या जोरावर तो सुखरूप बचावला.

घटनेमुळे सावंतवाडी-कोलगाव मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. डंपरवरील झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा