You are currently viewing प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

HDFC मध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सिंधुदुर्गनगरी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत HDFC मध्ये बँकिंग व फायनान्शियल सर्व्हिसेस (Banking & Financial Services) क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी जिल्ह्यासाठी एकूण ६ जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी 12 जुलै, 2026 पर्यंत अर्ज सादर करुन  या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे.

            पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation in Any Discipline) उमेदवार अर्ज करू शकतात. अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले पदवीचे विद्यार्थी (Final Year Graduation Students) देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. वय -१८ ते २५ वर्षे

            अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज लिंक: https://pminternship.mca.gov.in

            अर्ज प्रक्रिया, पात्रता किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक- ०२३६२-२२८८३५ तसेच whatsapp Channel लिंक-https://whatsapp.com/channel/0029VbAeyftKgsNvouee013d

Whatsapp/ Facebook/ Instagram हन्डेल नाव- Sindhudurg Rojgar याला जोडावे वेळोवेळी विविध योजनांची माहिती प्राप्त होईल.

            पात्र युवकयुवतींनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून या उत्कृष्ट करिअर संधीचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा