You are currently viewing पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावाजिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी

शामराव पेजे कोकण व इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ व 13 उपकंपनी असलेल्या जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थी/विद्यार्थींनींकरीता महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु करण्यात  असली असल्याचे शामराव पेजे कोकण व इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी कळविले आहे.

        योजनेचे स्वरूप – राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रुपये 10 लाख पर्यंत. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रुपये 20 लाख पर्यंत

        लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे, अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

        कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे– अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.  तहसिलदारांचा उत्पन्नाचा व महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला. अर्जदार व अर्जदाराचे पालकांचे आधार कार्ड  ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका.  अर्जदार व अर्जदाराचे पालकांचे पासपोर्ट फोटो व आधारकार्ड प्रती अर्जदाराचा जन्माचा / वयाचा पुरावा शैक्षणिक शुल्क संबधित पत्र., शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. आधार संलग्न बँक खाते पुरावा.  तसेच इतर आवश्यक कागदपत्रे/ पुरावे.

शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम

राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम 

        आरोग्य विज्ञान – MBBS,BDS,BAMS,BHMS,B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

        अभियांत्रिकी  B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम इ.

        व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम, इ.

        कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

देशांतर्गत अभ्यासक्रम – केंद्रीय परीषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खासगी मान्यताप्राप्त (NACC ) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

परदेशी अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी

        अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्या रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु असे पर्यंत बँकेकडे नियमित भरणा केलेल्या व्याजाचा परतावा महामंडळ अदा करेल.

सदर योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी बँक कर्ज मंजूरी अगोदर आपले अर्ज महामंडळाच्या

प्रतिक्रिया व्यक्त करा