You are currently viewing मिशन आयएएस विदर्भातील मुलांना सशक्त बनवीत आहे . सुदर्शन गांग

मिशन आयएएस विदर्भातील मुलांना सशक्त बनवीत आहे . सुदर्शन गांग

मिशन आयएएस विदर्भातील मुलांना सशक्त बनवीत आहे .
सुदर्शन गांग

अमरावती

मिशन आयएएस ही संस्था विदर्भातील विद्यार्थ्यांना तत्पर तेजस्वी व तपस्वी बनवीत आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ साकार करण्याचे काम या संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी स्वीकारून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे असे उद्गार अभिनंदन बँकेचे पदाधिकारी व जागतिक जैन संघटनेचे उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री सुदर्शन गांग जैन यांनी काल अमरावती येथे काढले. मिशन आयएएसचे संस्थापक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री गोविंद कासट मित्रमंडळी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. याप्रसंगी त्यांनी व गोविंद कासट मित्रमंडळींनी सौ विद्या काठोळे व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा महावस्त्र व मोत्यांची माळा देऊन सत्कार केला. याप्रसंगी सर्वश्री गोविंद कासट विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकारी प्राचार्य डॉ. शोभा रोकडे महानगरपालिकेच्या माजी पदाधिकारी श्रीमती प्रभा आवारे पर्यावरण कार्यकर्ते प्रवीण वासनिक डॉ. चारुदत्त चौधरी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक राजन देशमुख अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील निवारा केंद्राच्या ज्योती राठोड व राजू बसवनाथे गणेश मोरे नागपूरच्या अध्यापिका रश्मी कावरे विवेक सहस्त्रबुद्धे निलेश ठाकरे मिशन आयएएस च्या सहसंचालिका पल्लवी एरुळकर सेवन हॅबिट चे प्रशिक्षक प्रा आशय रोकडे नरेंद्र तायडे यांनी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे सरांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका व महानगरपालिकेच्या माजी पदाधिकारी श्रीमती प्रभा आवारे यांनी केले. गोविंद कासट मित्रमंडळीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपस्थित सदस्यांचे पुस्तके देऊन काठोळे परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले. या कौटुंबिक कार्यक्रमाला श्री गोविंद कासट मित्र परिवारातील व काठोळे परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

_________________________
*संवाद मीडिया* 

*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*

डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
**श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )

*DTE CODE-03712*

*👉अभ्यासक्रम :*

*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.

*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*

*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे

*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*

संपर्क-9420156771, 9145623747, 7887561247

*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी

(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204427/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा