श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या भौतीकशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर सलीम नाईक निवृत्त.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर श्री आय ए . नाईक तथा श्री सलीम नाईक आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सौ.नाईक यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, संस्थेचे संचालक प्रा डी.टी.देसाई, नियमक मंडळ सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.आर.बी. शिंत्रे, सौ नाईक, महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्रा.आर.बी. शिंत्रे यांनी केले. श्री सलीम नाईक हे वक्तशीर, आपल्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करणारे व महाविद्यालयाबद्दल आस्था असणारे कर्मचारी होते असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ. बी एन हिरामणी, डॉ. जी एस मर्गज, डॉ. वाय. ए. चौधरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी श्री सलीम नाईक हे महाविद्यालयाचे विश्वासू व प्रामाणिक, महाविदयालयाशी एकनिष्ठ असलेले कर्मचारी होते. त्यांचा ऋणानुबंध महाविद्यालयाशी व राजघराण्याशी कायम राहिलेला आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाय.ए. चौधरी यांनी केले व आभार मानले.
