You are currently viewing ओल मनाची सांगाया

ओल मनाची सांगाया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अष्टाक्षरी रचना*

*ओल मनाची सांगाया*

झालं आभाळ कोरडं
मेघामधे नाही सर
ओल मनाची सांगाया
सापडेना तो आधार…!!

मन पाषाण जाहले
हरवली संवेदना
सारे आपले म्हणता
ठरे नुसती व्यंजना…!!

रक्त आटतही नाही
घाव करेना घायाळ
दुःख बघता डोळ्यांनी
जीव होईना व्याकुळ…!!

आतड्याला पीळ नाही
रुक्ष मनस्थिती आली
सख्खे इतर समान
भावनांची कोंडी झाली…!!

रिंगणात आपापल्या
बोथटल्या भावनांनी
जाणीवाच करपल्या
स्वार्थ द्वेष विचारांनी…!!

कुठे आटला तो आता
इतरांचा गहिवर
व्यथा सांगायची कोणा
प्रश्न करी निरुत्तर…..!!

**** ******** ****
अरुणा दुद्दलवार @✍️

_________________________
*संवाद मीडिया*

*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*

*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*

*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

*📞 संपर्क:*

*9960906947 / 9422620047*

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा