You are currently viewing गाव माझा पोरका…..!!

गाव माझा पोरका…..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गाव माझा पोरका…..!!*

 

सांज पेरणीचा घास

भरवायचा राहून गेला

सांज बांधाचा गाव

माझा पोरका झाला..!

 

उजेडांत सावली सोडून

ती येते म्हणाली

सूर्य पदरानं झाकून

सावली सोडून गेली..!

 

सूर्य सांजावला बागेत

मी…माझी सावली हरवली

सांजकाळोख शिरला उंबरठ्यावर

मी…माझी माऊली गमावली..!

 

सांज दुःखाने आजही

पोर आक्रोश करतं

सांजभर तिचं सांजगीत

सांज नादात उरतं…!

 

ती परत यावी

गोधडीत सूर्य लपवला

तिन्हीसांजेचं गाण गात….तिने

सांजकाळोखात काजवा जपला..!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा