You are currently viewing ओरस आयटीआयचे कर्मचारी विजय तावडे यांचे निधन

ओरस आयटीआयचे कर्मचारी विजय तावडे यांचे निधन

ओरस आयटीआयचे कर्मचारी विजय तावडे यांचे निधन

चार महिन्यांवर सेवानिवृत्ती असताना काळाचा घाला; ओसरगावात शोककळा

ओसरगाव

ओसरगाव येथील रहिवासी तथा ओरस आयटीआयमधील कर्मचारी विजय वासुदेव तावडे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजय तावडे हे चार महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार होते. ते ओएनजीसीचे सेवानिवृत्त कर्मचारी महादेव तावडे यांचे बंधू, वागदे येथील आरोग्य सेविका सौ. अश्विनी तावडे यांचे पती, ओंकार तावडे यांचे वडील, जाणवलीचे माजी सरपंच काका राणे यांचे मेहुणे तसेच ‘मातोश्री’चे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे यांचे मेहुणे होते.

त्यांच्यावर आज पटेलवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा, भाऊ, वहिनी तसेच मोठा आप्तेष्ट व मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा