सावंतवाडी सिंधुदुर्ग बँक सेवानिवृत्त अधिकारी मिथिलनाथ राऊळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग बँक सेवानिवृत्त अधिकारी मिथिलनाथ गजानन राऊळ आपल्या निवृत्तीप्रसंगी त्यांचा प्रत्येकाला अभिवादन वाटला अशी गोष्ट त्यांनी केली.
सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना ते म्हणाले “माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला मला बुके, हार, तुरे किंवा भेटवस्तू देऊ नका तर त्यासाठी जमवलेले पैसे मला दया ते पैसे मी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देईन,कारण त्यांचे सेवाभावी उपक्रम जसे निराधारांना आधार देणे, रुग्णांना सेवा देणे, तसेच समाजामध्ये माणुसकी जिवंत ठेवण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे त्यांच्या अशा उपक्रमांना आपण सुद्धा थोडा फार हातभार लावूया जेणेकरून गोरगरिबांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतील.
त्यांच्या हा विचार प्रत्येकाला अभिमानास्पद वाटला व निवृत्तीप्रसंगी जमलेली रक्कम राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांसाठी दिली.
मिथिलनाथ गजानन राऊळ बिबवणे कुडाळचे रहिवाशी.
गेली 33 वर्ष सिंधुदुर्ग बँक कर्मचारी ते अधिकारी या पदावर त्यांनी काम केले.
4 वर्षे त्यांनी सावंतवाडी शाखेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले.
बँकेच्या प्रत्येक ग्राहकाशी व कर्मचाऱ्यांशी ते नेहमी सौजन्याने वागत असल्याने कर्मचारी व ग्राहकांच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळचं स्थान निर्माण झालं होतं.
शाखा व्यवस्थापक श्रीधर शिंदे यांनी राऊळ यांच्या बद्दल बोलताना म्हणाले की, असे अधिकारी आमच्या बँकेला लाभले हे आमचे भाग्यच आहे. त्यांच्याकडून खूप काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाले. आजपर्यंत ते कधीही कोणाशी वरच्या आवाजात बोलले नाही तर काही कुणाचं चुकत असेल तर शांतपणे ते त्यांना समजावून सांगत असत. एक साधा व सरळ आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहत आलो.
बँकेचे संचालक श्री महेश सारंग म्हणाले जरी सन्माननीय राऊळ आज निवृत्त झाले असले तरी अशा अधिकाऱ्यांची आमच्या बँकेला आवश्यकता आहे याबाबत आपण लवकरच अध्यक्षांशी बोलून युवा पिढीसाठी रोजगार संदर्भात काही शासकीय योजने संदर्भात विविध योजनेंचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना त्या डिपार्टमेंट तांदूळ देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.
याप्रसंगी बँकेचे संचालक मा.श्री महेश सारंग, शाखा व्यवस्थापक श्रीधर शिंदे,मधुकर देसाई संदीप, संदीप धारगळकर, प्रा प्रा.सचिन पाटकर, वीरेंद्र धुरी सदाशिव आडवे, कादर शेख, प्रकाश ठाकूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम उपस्थित होते.
