*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!”*
वैद्यकीय व्यवसाय आहे अक्षय व्रत
सेवा करिती मानवाची अखंडित IIधृII
रुग्णसेवेत सदा रहाती कार्यरत
मनुष्य प्राण्याला देती जीवन दान
समाजकार्य करिती बहु मूल्यवानII1II
कधी न पाहती वेळ काळ राहती सेवेत
कुणी निंदा-वंदा कार्यात राहती मग्न
यशापयश पचवित शांत मनानंII2II
समाज आरोग्य सांभाळती देवदूत
धन्वंतरीचे डॉक्टर पाईक सुपूत
योग्य वेळी निर्णय घेती धाडसानंII3II
शस्त्रक्रिया औषधे ठेवती स्मरणांत
रुग्णाला तपासून करिती योग्य निदान
रुग्णांस बरे वाटता देती घेती आनंदII4II
©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
