*प्रणाली येरम हीचा भाजपा च्या वतीने सत्कार*
वेंगुर्ले
वेंगुर्ले शहरातील कॅम्प येथील मा.नगरसेवक उमेश येरम यांची सुकन्या प्रणाली हिने फार्मासुटीकल सायन्स या विषयात पीएचडी मिळविल्याबद्दल भाजपा च्या वतीने महीला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , नगरसेवक रविंद्र शिरसाठ , उमेश येरम , उर्मिला येरम व येम कुटुंबीय उपस्थित होते .
प्रणाली हिने पीएचडी शिक्षणाबरोबर विद्यापिठाची डाॅक्टरेट फेलोशीप सुद्धा मिळवली. त्यामुळे तीचे विशेष कौतुक होत आहे .
प्रणाली ने क्राॅनिक किडणी डिसेज ( ckd ) याविषयावर संशोधन केले असुन या क्षेत्रातील संशोधन पर लेख उच्च प्रभावंक असलेल्या ” आंतरराष्ट्रीय संशोधन ” या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
सद्ध्या ती नवी मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असुन अध्यापन , संशोधन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान देत आहेत. या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे . तिच्या कॅम्प येथील निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला .
