“जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आरोंदा हायस्कूलमध्ये वह्या वाटप ”
सावंतवाडी
कोकणातील पाचही जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळ शिक्षण,आरोग्य, रोजगार, प्रशिक्षण व महिला सबलीकरण अशा विविध क्षेञात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश सांबरे यांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम सुरू आहे. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ परिवाराचे सदस्य अँड.नकुल पार्सॅकर यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील काही ग्रामीण शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला असून गेल्यावर्षी या दोन्ही तालुक्यात सुमारे तीस हजारांहून जास्त वह्यांचे वाटप करण्यात आले होते.यावर्षीही हा उपक्रम काही निवडक शाळांमध्ये राबवण्यात येत आहे.त्या अनुषंगाने
आरोंदा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्पा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी .अँड.नकुल पार्सॅकर यानी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे याच्या सामाजिक कामाचा आढावा घेऊन भविष्यात जिल्ह्यात जिजाऊ संस्थेमार्फत काही समाजाभिमुख उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह व आरोंदा गावचे सुपूञ श्री रघुनाथ तानावडे.आरोंदा शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री
भाई देऊलकर,शाळेचे मुख्याध्यापक श्री सिद्धार्थ तांबे,सहशिक्षक श्री ताराचंद राठोड,सौ.भावना माजगावंकर, सौ.सुप्रिया कोरगावकर, श्री श्रीकृष्ण गावडे,श्री वसावे आदि मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री तांबे यानी केले तर कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री गोसावी यानी केले.
