You are currently viewing स्वयंभू दीपिका
Oplus_16908288

स्वयंभू दीपिका

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम लेख*

 

*स्वयंभू दीपिका* 

 

आपल्या देशातील साहित्यात अगदी अक्षर ओळख नसलेल्या महिला देखील आध्यात्म आणि भक्तिमार्गावर स्वयंभूपणे जनसामान्य आणि भक्त यांचेसाठी दीपिका बनून तेवत राहिल्या आणि अक्षर ओळख असलेल्या काही तर मोठ्या उंचीवर पोचल्या आहेत. सुरवातच करायची मोजायला तर संत कवयित्री मुक्ताई, जनाबाई, महदंबा पासून ते काश्मीरच्या लल देद उर्फ लल्लेश्वरी पासून सुरवात करायला हवी. स्त्रियांना शिक्षण नव्हत, अक्षरओळख नव्हती तरी संत स्त्रियांनी आपली स्वरचित काव्य, अभंग मुखोदगत करून ती शश्रीहरी, विठूमाऊली यांच्या पायावर ठेवताना समाजात पेरली, संग्रहीतदेखील झाली. यांना ईश्वर भक्त म्हणा वा स्वत्व जागृत झालेल्या स्त्रियां म्हणा. पण आज देखील त्यांच साहित्य काव्य हे कालातीत आहे. बहिणाबाई तर साध्य साध्या शब्दात रोजच्या जगण्यातील तत्वज्ञान शिकवून जातं त्यांचं साहित्य! सहज सोप्या शब्दात!त्यांची कवन ओठावर रूळतात. संत जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई, गोणाई, राजाई सोसूबाई, नागरीबाई याची नावं आणि त्यांनी निर्माण केलेली कवने अभंग ओव्या ऐकल्या असतील तुम्ही!

अक्षर साहित्य छपाईला सुरवात झाली आणि संत कवयत्रींचं अमोघ असं साहित्य भांडार जनसामान्यांच्या हातात आलं. शिक्षणाची दार स्त्रियासाठी उघडी करणाऱ्या सवित्रीबाई फुले, पंडिता रामबाई, मॅक्सिम गार्की याच्या मुळे स्त्रियांना साहित्याचा प्रांतात आपला ठसा उमटवता आला. अमाप मुशफिरी करता आयला लागली.

यातली एक स्वयंभू दीपिका मुक्ताई

जेव्हा विद्येची दार स्त्रियांना उघडी नव्हती तेंव्हा जन्मलेली एक अनाथ पोर, समाजाने वाळीत टाकलेल्या चार भावांडातील धाकटी मुक्ताई!

आई वडिलांच्या सहवासाला मुकलेली विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कुलकर्ण्यांची लेक मुक्ता! पुढे ती झाली तीन मोठ्या भावंडांची आई! मुक्ताई! आणि सर्वांसाठी संत कवयित्री मुक्ताबाई. जन्म १२७९ साली आपेगावं मधे झाला. आणि जीवनाचा शेवट झाला १२९७ मधे.

 

समाजाच्या छळवणूकिणीने जेरीस आलेल्या निवृत्ती ज्ञाना आणि सोपान यांना जगण्याची उमेद द्यायची जबाबदारी यायची तिच्यावर ! या छोट्या बहिणीवर! जगाकडे राग आणि निराशा यामुळे खचून जाऊन पाठ फिरवणाऱ्या तिच्या ज्ञानाला मग ती म्हणाली,

“योगी पावन मनाचा/साहे अपराध जनांचा/विश्व रागे झाले वन्ही/ संत सुखे व्हावे पाणी/ शब्द शस्त्रे झाले क्लेश/ संती मनावा उपदेश/ विश्वपट ब्रम्ह दोरा/ताटी उघडा ज्ञानेश्वरा//

असे हिचे ४२ ताटीचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. हे स्वरचित ताटीचे अभंग म्हणजे आध्यात्म मार्गाच्या वाटेवरचे दीपस्तंभ आहेत असं

संत एकनाथ म्हणतात! किती तरी कसोटीच्या प्रसंगात आत्मसाक्षात्कार झाल्यागत तिच्या मुखातून कवन, अभंग वहात राहायचे. हरिपाठाच्या अभंगातून तिची निर्भीड स्पष्टवक्ती, हजरजबाबी वृत्ती आपोआप प्रकटली व्हायची. नामदेव म्हणतात ‘मुक्तपणे मुक्त अशी ही योगियांची विश्रांती’

संत नामदेवानी संत मेळ्यात मुक्ताईच्या तिन्ही विद्वान भावंडांचा भर सभेत अपमान केला गेला . ते या बहिणीला सहन झाले नाही. म्हणून तीने त्याना सडेतोडपणे सुनावले,

“अखंड जयाला देवाचा शेजार/ काय अहंकार गेला नाही/ मान अभिमान वाढविशी हेवा/ दिस असता दिवा हाती घेशी//

 

परब्रम्हासंगे नित्य तुझा खेळ/ आंधळ्याचे डोहाळे का बा झाले/ कल्पतरु तळवटी इच्छिल्या त्या गोष्टी/ अद्यापी नरोटी राहिली का//

नामदेवाचा अपमान करण्याचा हेतू यात नव्हाताच! उलट हा सच्चा भक्त अहंकार विरहित व्हावा, त्यांना योग्य गुरु मिळावा हा त्यातला हेतू होता.

गर्विष्ठ चांगदेवाचा गर्व घालवायला तीने अशा काही युक्त्या केल्या की शेवटी ती लहान असून त्याना गुरुस्थानी झाली

 

ज्ञान बोध ग्रंथात तीचे आणि मोठे बंधू संत निवृत्ती नाथ यांच्यातील झालेला तत्विक आणि आध्यत्मिक संवाद त्यांच्या समाधीपूर्वी झाला.त्याचे उल्लेख आहेत

मुक्ताईचे ‘कल्याण पत्रिका’ ‘हरिपाठ मनन हे तिच्यावर जी संत गोरक्षनाथ यांची गुरु कृपा झाली त्यातून स्फूरलेलं साहित्य आहे.

 

तिच्या एकूण पाऊणशेच्या आसपास अभंग रचना असून या काव्यगुणांनी

संपन्न आहेत. ते जसे भक्तीपर आहेत तसेच योगमार्गाच्या खुणानी युक्त आहेत.

 

मुक्तपणे मुक्त/ मुक्ताई पै रत/ हरीनाम स्मरत/ सर्वकाल/ अशी तिची सदा अवस्था असायची. यातून तिच्या मातृमनाचे मार्दव आणि स्त्री मनाचा हळुवारपणा डोकावत राहतो तसेच तीला झालेला साक्षात्कार आणि योगमार्गाचे दर्शन

 

निवृत्तीनाथानी तीला नाथ पंथाची दिक्षा दिली. आणि बाल वयातच ती प्रौढ झाले.

आणि तीला म्हणावंस वाटलं,

“आसनाचिया पाऊटी/ प्रौढ व्हावे सद्गुरूच्या पोटी/ तेथे आत्मगुह्याच्या गोष्टी/ संपादाव्या//

 

नियम वृत्तीचा काय सांगवा गुण!

मुलद्वारी दादा स्थापिला गणपती

माया ही उपत्ती कैसे झाली

मायेचा बंबाळ जाये एकसरा

इच्छाही ही आधारा सांग दादा”

 

एकदा मुक्ताईची सहज समाधी लागली. त्या बद्दल ती लिहिते

 

सहज समाधी लागली निर्गुणी/खुंटलिसी वाणी न चाले पुढे/ खुंटला हा शब्द/ राहिला व्यवहार/ झाला साक्षात्कार सदोदित/ गळाली इंद्रिये/ राहीलेसे मन/माझे महा शून्य /झाले एकाएकी//

 

अशी ही दीपिका!मुंगी उडाली आकाशी असं हीच अलौकिक जीवन! एक अजरामर दीपिका

********************

 

@ अंजना कर्णिक

प्रतिक्रिया व्यक्त करा