You are currently viewing निबंध लिहा निबंध

निबंध लिहा निबंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निबंध लिहा निबंध* ( बाल गझल )

——————————

 

व्याकरण आणि शुद्ध भाषेत बद्ध असावा निबंध

विषयानुरूप मनापासून छान लिहावा निबंध

 

शिर्षक द्यावे आकर्षक अन सुरवात मस्त करावी

परिच्छेदात नवीन मुद्दा, बहरत जावा निबंध

 

थोर माणसे, संत मंडळी काय बोलती ऐका

जाता जाता त्या वचनांनी मस्त सजावा निबंध

 

अक्षर काढा सुंदर, सोबत टापटीप पण ठेवा

कविता ओळी, म्हणी पेरता झकास व्हावा निबंध

 

मर्यादेचे करून पालन खाडाखोडी टाळा

वर्गामध्ये केवळ तुमचा सरस दिसावा निबंध.

 

श्रीनिवास गडकरी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा