कणकवली / प्रतिनिधी :
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गभर विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर एम्पायर रिअल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा तथा शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर यांनी सुवर्णगड येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट देत पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुदस्सर शिरगांवकर यांनी नितेश राणे यांचे अभिनंदन करत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या. या प्रसंगी प्रणय शेटये हेही उपस्थित होते.
