You are currently viewing नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असलदेत दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान सेवा

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असलदेत दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान सेवा

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असलदेत दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान सेवा

असलदे ग्रामपंचायत, सोसायटी व भाजपाचा उपक्रम; वृद्धांचे आशीर्वाद, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

कणकवली :

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत, असलदे सोसायटी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी अन्नदान सेवेचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे वृद्धाश्रम व्यवस्थापनाने स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
दिविजा वृद्धाश्रम संस्थेचे संदेश शेटये यांनी या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या कार्याला यश लाभावे, असा आशीर्वाद दिला. तसेच त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, पुढील वाटचालीत यश व समृद्धी मिळावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर, सोसायटीचे चेअरमन भगवान लोके, भाजपाचे सरचिटणीस पंढरी वायंगणकर, उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, उपाध्यक्ष रघुनाथ लोके, कमलेश पाटील, भाजप युवा मोर्चाचे शक्तीकेंद्रप्रमुख प्रविण डगरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, राजू तांबे, व्यवस्थापक संदेश शेटये यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा