You are currently viewing बाप नावाची माया…
Oplus_16908288

बाप नावाची माया…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

बाप नावाची माया…

 

अंतरीच्या देव्हार्यात बाप माझा बसवलाय,

वाट जिवनाची अनवाणीच चाललाय

वाट दगडाधोंड्याची नव्हती कूठे सावली,

पाठीशी साथ माझी माय रखमामाऊली.

झेलत झेलत मला आयुष्य त्याचं संपलंय,

स्वत:साठी कधी त्याने काहीच नाही ठेवलंय.

ऊन डोक्यावर त्याच्या अन् माझ्यावर त्याची छाया,

कूठे मोजू अशी त्याची मी माया,

कळला माझा बाप आणि माझी माय,

देवघरातच होते तर रखमाई आणि विठूराय,

फोटोपर्यंत कधी पोंचले कळलंच नाही,

आता ते हंसतात आणि मी रडत राही.

भावना कधी शब्दात बोललाच नाही,

संघर्षाच्या वाटेत बाप कधी थांबलाच नाही.

रक्ताळलेले पाय अन् घामेजलेलं अंग,

हा मात्र सतत रस्ता तुडवण्यात दंग.

नाही कधी थकला नाही कधी माघार,

आज पायी माथा टेकता हंसतो विनातक्रार.

माझं प्रेम कधी सांगताच आलं नाही,

दुरूनच मला तो पाहत राही.

मला मात्र आता रोज तुमची आठवण येते,

लेक मोठी केलीत हे लक्षात आणुन मी देते.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुं. 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा