You are currently viewing स्वखर्चातून गणेश विसर्जन मार्गाची दुरुस्ती; शरद धाऊसकरांनी पाळला दिलेला शब्द

स्वखर्चातून गणेश विसर्जन मार्गाची दुरुस्ती; शरद धाऊसकरांनी पाळला दिलेला शब्द

स्वखर्चातून गणेश विसर्जन मार्गाची दुरुस्ती; शरद धाऊसकरांनी पाळला दिलेला शब्द

आरोस-दांडेलीतील वर्षानुवर्षांची समस्या मार्गी; ग्रामस्थांकडून जनसेवेच्या कार्याचे कौतुक

आरोस-दांडेली :

गणेश विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या आरोस-दांडेली येथील रस्त्याची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली दुरवस्था दूर करत पंचायत समिती सदस्य यांनी दिलेला शब्द कृतीत उतरविला आहे. शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून या रस्त्याचे दर्जेदार काम पूर्ण केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गणेशोत्सवादरम्यान दांडेली परिसरातील ग्रामस्थांना चिखल आणि खडतर वाटेचा सामना करत गणपती बाप्पाचे विसर्जन करावे लागत होते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन धाऊसकर यांनी पुढाकार घेत रस्त्याची दुरुस्ती करून मार्ग सुकर केला.

निवडणुकीत दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवत जनतेशी बांधिलकी जपल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे तसेच या कामासाठी परिश्रम घेतलेल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या रस्त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार असून ग्रामस्थांनी धाऊसकर यांच्या जनसेवेच्या भूमिकेचे विशेष स्वागत केले आहे.

गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी राजकारणापलीकडे जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून शरद धाऊसकर यांची ओळख अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा