You are currently viewing शहीद सैनिकांच्या छायचित्र गॅलरीचे प्रधान सचिव सीमा व्यास यांच्या हस्ते उद्घाटन

शहीद सैनिकांच्या छायचित्र गॅलरीचे प्रधान सचिव सीमा व्यास यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी

येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त उभारण्यात आलेल्या शहीद सैनिकांच्या छायाचित्र गॅलरीचे उद्घाटन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास यांच्या हस्ते आज करण्यात आले.

                याप्रसंगी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, संचालक प्रमोद यादव, उपसंचालक निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दत्तात्रय भडकवाड, ठाण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजळ जाधव, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गंगाराम सस्ते आदी उपस्थित होते.

                श्रीमती व्यास यांनी छायाचित्र गॅलरी पाहून, अतिशय स्तुत्य उपक्रम असून याची सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी अशी प्रतिक्रीया दिली. यावेळी शहीद दिनदर्शिकेची माहितीही घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या या उपक्रमासाठी श्रीमती व्यास यांनी सर्व पथकाला शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − seven =