*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाहिलं मी*
पाहिलं मी सतत
कळीचं फूल होताना
गंध पाकळीत दरवळता
झाड आनंदाने हसताना….
पाहिला मी ओला दुष्काळ
उभं पीक गेलं झोपून
कास्तकाराच्या डोळ्यातील
अश्रू जाती त्यात मिसळून….।।
पाहिले मी अश्रू पिऊन
दुःख सोसताना
वाटेवरील काट्यांचा सल
पायी वेदना सोसताना…..।।
पाहिली मी हिरवी पानं
दवात न्हाताना
वा-यासवे गिरकी घेत
मनसोक्त गाताना…..
पाहिले मी डोळे भरून
पिवळं पान बिलगलं
फांदीला आसुसून
मिठी घालत गळालं..!!
०००००००००००००००🌿🌷
अरुणा दुद्दलवार@✍️
