*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एक आर्त – येरे येरे पावसा*
येरे येरे पावसा , कुठे लपला तू !
असा कसा रुसून , कुठे बसला तू!
आभाळाच्या गाभाऱ्यात , कुठे लपला तू !
दर्याच्या मुळाशी , का रे बसला तू !
ढगांचा गडगडाट , कानी ऐकू दे तू !
विजेच्या लखलखाटात , डोळे दिपू दे तू !
वारा घाली शीळ , भेटायला ये तू !
झाडी झुडपे देती साद , भिजवायला ये तू !
मृद्गंध दरवळण्या ये , कुठे लपला तू !
हिरवा शालू घेऊन ये , कुठे बसला तू !
पशुपक्षी तहानले , तृप्त करण्या ये तू !
नदी नाले ही आटले , काठ भरण्या ये तू !
जीव-सजीव आतुरले , वर्षा घेऊन ये तू !
बळीचे डोळे पाणावले , हसू बघण्या ये तू !
जीवनाच्या संकटात , कुठे रे लपला तू !
तुझ्या शिवाय जगणे कठीण , कुठे रे बसला तू !
येरे येरे पावसा , कुठे लपला तू !
असा कसा रुसून , कुठे बसला तू !
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर ) धुळे.*
*7588318543.*
